शनिवार, १८ ऑगस्ट, २०१२

किल्ले बाणूरगड .......... शिवरायांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची समाधी

किल्ले बाणूरगड हा इतिहासात भूपाळ्गड या नावाने ओळखला जातो, सांगली जिल्ह्यातील खानापूर  आटपाडी व कवठे महांकाळ तालुका व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका अशा चार  तालुक्यांच्या सीमारेषेवर भूपाळ्गड उभा आहे. शिवकालात स्वराज्याच्या सीमरक्षेच्या दृष्टीने भूपाळ्गडास अनन्यसाधारण असे महत्व होते.
                          'बुसातिन-उस-सलातिन' या साधन ग्रंथानुसार छत्रपती शिवरायांनी मांजर्‍या नजीकच्या पर्वतावर एक मजबूत किल्ला  बांधून त्यास भूपाळ्गड नाव दिले.तर एका लोककथेनुसार भूपालसिंह राजाने हा गड बांधला म्हणून या गडाचे नाव पडले भूपाळ्गड. शिवाजी महाराजांना विजापूरवर लक्ष ठेवण्यासठी एका किल्ल्याची आवश्यकता होती.  बानुरगडाचा   हा डोंगर शिवरायांच्या मनात भरला  व तेथे किल्ला बांधण्याचा निर्णय शिवरायांनी घेतला...    भूपाळ्गडाची किल्लेदारी शिवरायांनी फिरंगोजी नरसाळा या अनुभवी सहकार्‍याकडे दिली,
विजापूरवर चालून जात असताना वाटेत लागणार्‍या भूपाळ्गडावर (बानुरगड) मोगलानी हल्ला चढविला.या युध्दात दिलेरखानाने शेजारील डोंगरावरून तोफा डागून गडाचा एक बुरूज पाडला....   भूपाळ्गड (बानुरगड)मोगलांच्या ताब्यात गेला.
भूपाळ्गड (बानुरगड) हा किल्ला आकाराने विस्ताराने प्रचंड क्षेत्रफळाचा आहे याच्या एका कोपर्‍यावर बाणूरगड गाव वसलेले आहे.गावातून पायवाट गडावर जाते येथून पुढे कातळात खोदून तयार केलेल्या एका मोठ्या तलावावर येवून पोहोचतो, यानंतर तेथून बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी  दगडी पायर्‍यांची वाट आहे....  टेकडी समोरच शिवकालातील गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची दगडी चैथर्‍यावर वृंदावन समाधी आपणास दिसेल.  जवळच महादेवाचे मंदिर असून ते बाणूरलिंग या नावाने ओळखले जाते. . समाधी समोरून जाणार्‍या पायवाटेने थोडे खाली उतरल्यावर आपणास गडाची तटबंदी पहायला मिळते,दगड एकमेकावर रचून तयार केलेल्या या तटबंदीत जागोजागी बाहेर पडण्यासाठी छोटे चोर दरवाजेही तयार केले आहेत. भूपाळ्गड हा किल्ला आकाराने विस्ताराने प्रचंड असला तरी एक तलाव ,महादेव मंदिर,समाधी व जुजबी तटबंदी असे मोजके अवशेष शिल्लक आहेत.

1 टिप्पणी: